गोष्टीला बऱ्याच अंशी मराठी वाचकच कारणीभूत असावेत. त्यांनी लेखकांना कवींना लोकानुनयी लिहिण्याची सवय लावली आहे.
एकंदरित मराठी कवितेतील तथाकथित कृत्रिमतेचे, ललितलुलिताचे कारण वाचक आहेत असा प्रस्ताव आहे. (असे मला कळले आहे. चुकीचे असल्यास सांगावे.) समजा मराठी वाचकांनी जे एकदम खरे उच्च काव्य आहे त्यालाच डोक्यावर घेतले असते, तर कवींनी खउकाव्य लिहिले असते! हे लोकानुनयी नाही काय?
माणसे सगळीच बऱ्यापैकी लोकानुनयी असतात. लोकमान्य टिळकांपासून ते रामगोपाल वर्मापर्यंत सगळेच पब्लिकला काय रुचेल याचा विचार करतात. कवींनी का करू नये? शिवाय समजा एखाद्या कवीने खउकाव्य लिहिले आणि ते लोकांना पसंत पडेलसे आहे असे प्रकाशकाला वाटले नाही तर ते प्रसिद्ध होईल का?
दुसरा मुद्दा म्हणजे
कॅसेट लावून 'कल्ला रे', 'उच्च रे', 'जीव घेतो रे' असे म्हणत, अश्रू ढाळत.
कोणाला काय आवडावे हे कोण ठरवणार? जर्मन गटे महाशय कालिदासाचे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचले होते हे वाचून मी ते नाचताना नक्की कसे दिसत असतील अशी कल्पना करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आहे. किती भारतीयांना ते तितके भिडते? पण तरी ते प्रसिद्ध आहेच की! तसेच मराठी टीकाकार अमके तमके 'भयंकर सुंदर' असे म्हणत असतात त्या त्या गोष्टी थोड्याफार प्रसिद्ध होतातच. पण टीकाकाराचे आणि वाचकांचे खउ काय आहे याबद्दल मत जुळेलच असे नाही. ते जुळावे असा हट्ट का? कोणाला काय वाचून रडावेसे वाटावे हे कोणी तिसऱ्याने का ठरवावे? एखाद्याने अमक्याप्रकारचे लिहायचे ठरवले (असे ठरवून लिहिता येते का?) तर तो शहीद झाला असे कोणी का म्हणावे?