कोणाला काय आवडावे हे कुणाला ठरवता येत नाही. एखाद्याला फुटाणेच का आवडवेत, बदाम का नाही ह्या गोष्टीला उत्तर नाही. फुटाणे आवडणे गैर नाही. त्यांची लिज्जत न्यारी. पण फुटाणे आवडतात हे तर कळते ना. आणि तसे कुणी सांगणे  गैर नाही. 

अनेक वाचक कवितेच्या चेहऱ्यावर, बाह्य रूपावर भाळतात, असे मला वाटते. ते आत डोकावून आतला फोलपणा किंवा आशयाची, अभिव्यक्तीची सघनता जोखत नाहीत. कविता वाचताना गालावरून मोरपीस फिरवल्यासारखे वाटले. पण नंतर लक्षात आले हशील काहीच नाही, असे बरेचदा घडते.

तसेच मराठी टीकाकार अमके तमके 'भयंकर सुंदर' असे म्हणत असतात त्या त्या गोष्टी थोड्याफार प्रसिद्ध होतातच. पण टीकाकाराचे आणि वाचकांचे खउ काय आहे याबद्दल मत जुळेलच असे नाही. ते जुळावे असा हट्ट का? कोणाला काय वाचून रडावेसे वाटावे हे कोणी तिसऱ्याने का ठरवावे? एखाद्याने अमक्याप्रकारचे लिहायचे ठरवले (असे ठरवून लिहिता येते का?) तर तो शहीद झाला असे कोणी का म्हणावे?

शेवटी समकालीन साहित्याचा दर्जेदारपणा दुर्दैवाने मूठभर समकालीन अभिजन (प्राध्यापक, समीक्षक, प्रकाशक इत्यादी) ठरवत असतात. येणारा काळच एखाद्या कलाकृतीचा खरा दर्जा ठरवत असतो. 

मत मांडणे म्हणजे हट्ट करणे नाही.
>> टीकाराम ह्यांच्याशी सहमत.
थोडा हट्ट करणेही गैर नाही, द्विधा मनस्थितीत असणारी काही मंडळी आपल्या गटात येण्याची शक्यता असतेच.