भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही गोष्टी इंग्रज सोडून गेले, त्या पैकी एक म्हणजे त्यांची भाषा.

गोऱ्यांच्या भाषेने फक्त मराठीच नाही तर राष्ट्र भाषा हिंदी तसेच इतर भाषा तमीळ, तेलगू ई. वर सुद्धा शिरकाव केला. ह्याला अपवाद फक्त संस्कृत भाषा.

इंग्रजी भाषा दैनंदिन कामकाजाकरता सर्रास वापरू जाऊ लागली. आणि त्या भाषेने आपल्या घरात कधी प्रवेश केला ते समजले देखील नाही.

दिवसाची सुरुवात 'सुप्रभात' च्या ऐवजी 'गुड मॉर्निंग' च्या काट कोन -चौकोनाने झाली. नमस्काराच्या प्रेमळपणाची जागा 'हाय' च्या औपचारिकतेने घेतली. एकमेकांना भेटल्यावर आदरार्थी हात जोडून नमस्कार करण्या ऐवजी 'शेक हँड' च्या बरोबरीचे नाते दर्शवण्यात भूषण वाटू लागले.

थोडक्यात, हे प्रकरण भाषे पर्यंतच मर्यादित न राहता इंग्रजी भाषे बरोबर सांस्कृतिक आक्रमणा पर्यंत येऊन पोचते.

खालील तीन मुद्दे उदाहरणार्थ आहेत, विचार केल्यास असे बरेच मुद्दे सापडतील:

संस्कृतामधील संगणकप्रणाली जगातील इतर भाषेपेक्षा जास्त वेगाने पूर्ण होते, हाच नियम मराठीला सुद्धा असू शकेल.

मराठी भाषेचा गोडवा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वर्णन केला आहे.

इतके सर्व भाषेचे वैभव स्वतः जवळ असताना दुसऱ्या भाषेचा आधार घेणे म्हणजे, शुद्धीत असणाऱ्याने दारूच्या नशेत असणाऱ्याचा आधार घेणं होणार नाही का?

काही जण असाही युक्तिवाद करतात "इंग्रजी शब्द भाषेत आले म्हणजे ती मराठी भाषा राहात नाही काय?"  नाही, ती मराठी नाही, ती संकरित (हायब्रीड) भाषा होते. 

दुधात पाणी मिसळले तर ते दूध राहत नाही का? दुधात पाणि मिसळल्यावर त्याचे सत्त्व कमी होते हे आपल्याला समजते पण मराठीत इंग्रजीची भेसळ म्हणजे संस्कृतीस अपाय कारक हे समजत नाही का?

काहीच्या मते, मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी भाषेची धाटणी, तिच्या लकबी टिकायला, टिकवायला हव्यात, असेही तज्ज्ञ म्हणतात.

ह्याचा अर्थ आपण इंग्रजी जर मराठी धाटणीने, मराठी लकबीने बोललो, तर मराठी भाषा टिकेल?

माझ्या मते भाषेची धाटणी, लकबी टिकवायची असेल तर ती भाषाच बोलली पाहिजे, सरमीसळ केली तर ते हास्यास्पद होईल.

अरुण यांचा उपाय जास्त परिणामकारक व व्यावहारिक वाटतो.

हे इंग्रजी अल्सेशीयन कुत्रे किती दिवस माझ्या माय मराठीच्या गरीब गायीच्या मागे लागणार?

(माझा कोणाला दुखावण्याचा हेतू नाही, तसे झाले असल्यास चु.भु.दे.घे.)