बातमी नीट वाचल्यास हा गुन्हा केवळ स्त्री आहे म्हणून झालेला नाही हे स्पष्ट होईल. आरक्षण, दलितांना देण्यात येणाऱ्या सवलती यामुळे प्रगती करू पाहत असलेल्या दलित समाजाचे छोटेसे यश (अगदी स्वतःची जमीन स्वतः कसून पोट भरणे) हे देखील कुणाच्या पोटदुखीचे कारण ठरू शकते. जातीव्यवस्थेची उतरंड मनातून अजूनही गेलेली नाही हेच खरे :(

 

हे असं काही अगदी सुरूवातीपासून वाचते आहे. तरीही या प्रकरणाला स्त्रियांविरूद्ध गुन्हा असा सूर का लावला जातो हे कळत नाही?

स्त्रियांविरुद्ध गुन्हा असा सूर लावला की दलितांची मतपेटी हातातून जाणार नाही असे कदाचित राज्यकर्त्यांना वाटत असावे.

शरमेची बाब अशी की प्रिन्स खड्ड्यात पडला तर सलग दोन दिवस त्याचे थेट प्रक्षेपण करणारी सबसे तेज प्रसारमाध्यमे अशा प्रसंगी कित्येक दिवस गप्प बसतात.