जिज्ञासू,
मूळ गझल आणि आपलं रसग्रहण- दोन्ही सुरेख!
या गझलेच्या मतल्याबद्दल -
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!
गझलेतला 'तू' हा अनेकांना उद्देशून असू शकतो आणि त्यातून अर्थाच्या विविध छटा आणि गझलकाराचं भावविश्व दिसू शकतं.
(१) प्रेयसीचं उदाहरण तुम्ही दिलं आहेच.
(२) कल्पना करा, हीच ओळ एखादा मनुष्य देवाला उद्देशून म्हणतोय! ख्रिस्ती धर्मात तर धर्मगुरूंशी 'कन्फेशन' करणं प्रचलित आहेच. (ग़ालिबची उदा. विसाल-ए-यार ही कल्पना अशीच मनुष्य आणि देवाबाबत अभिप्रेत आहे. अगदी अलीकडची 'तेर बारे में जब सोचा नही था, मै तनहा था मग़र इतना नही था' ही जावेद अख्तर ची गझलही अशीच वाटते.)
- कुमार
- कुमार