काही महिन्यांपूर्वी मुंबईत स्फोट झाले आणि त्यावेळी तो विषयही मनोगतावर फारसा चर्चिला गेला नव्हता तेव्हा माझा असाच त्रागा झाला होता हे कदाचित आठवत असेल तुम्हाला. तेव्हा मलाही असंच वाटत होतं की यावर कोणी काही लिहीत कसे नाही. पण कोणाला अश्या गोष्टींचे किती कष्ट होतील ते त्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे असे नंतर वाटले.
सकाळीच लेख वाचला, आणि खरे तर आधीच्या चर्चेत (मिलिन्द म्हणतात) त्याप्रमाणे अजून स्पष्टीकरण देणार होते ते काही कामामुळे राहिले. आता मला काय वाटते ते सविस्तर मगच लिहीन. पण तुमचा प्रतिसाद पाहिला तेव्हा माझ्या त्राग्याची आठवण आली.
सुहासिनी