पण तुमचा प्रतिसाद पाहिला तेव्हा माझ्या त्राग्याची आठवण आली.
सहमत. मलाही झाली.
असहमत अशासाठी की सातीचा प्रतिसाद हा आकसातून आलेला आहे. तो उपरोधिक आहे आणि आपण चर्चा त्राग्यातून सुरू केली होती (आकसातून नसावी), तेव्हा फरक जाणवतो. त्यावेळी मी आपल्याशी बराच वाद घातला होता ते ही आठवले.
दोन्ही प्रकारांचा मी निषेधच करेन कारण अपुऱ्या माहितीवरून समाजावर सरसकट ताशेरे झोडणे मला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा माणसाने आपल्याला जे मुद्दे दिसले, पटले ते मांडून इतरांना त्यावर बोलण्यास आणि मत मांडण्यास उद्युक्त करावे. (असे केल्याने प्रतिसाद मिळेलच असे सांगता येत नाही कारण प्रतिसादांचे गणित वेगळेच असते पण तो प्रयत्न योग्य असतो.)
असो. त्या घटनेनंतर आपण दिलेले बरेचसे प्रतिसाद आवडतात हे प्रकर्षाने नमूद करू इच्छिते.
धन्यवाद.
-प्रियाली.