मिलिन्दराव,
जर मी वाचले नसते, तर पान क्रमांक दिला असता का? कृपया मुद्या वरून गुद्द्यावर येण्याचे टाळवे, मला सुद्धा तुमच्यावर व्यक्तीगत टिका, टोमणे मारता येतील.
तुमचे वाचन पहिल्या भागा पर्यंतच मर्यादित आहे.
दुसऱ्या भागात (पॅरेग्राफ़) मध्ये स्पष्ट उल्लेख आहे: जपानी समूहाला अरेबिक, स्पॅनिश, इंग्लिश इत्यादी पेक्षा संस्कृताने शब्दाने परिणामकारक कमी हानी पोचली.
दुवा क्रमांक २ मधील काही वाक्य
"संस्कृत लैंगवेजस आर डिस्टीनी टु क्विकली बी युवर फ़ेवरेट रिसर्च टुल."
"There is a well-known amenity between Sanskrit and computer technology."
मला ईतर वाक्य येथे ईंग्रजी शाब्दीक मर्यादेने देता येत नाहीत, क्षमस्व.
पण, तुमचे वरील गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे.
व्यक्तीगत टिका न करता, माझ्या मते तुम्ही जर ह्या लेखांवर विचार केलात, तर असे लक्षात येते, की संस्कृत भाषेचा संगणक क्षेत्रात प्रभावी उपयोग केला जाउ शकतो.
तुम्ही सांगितलेल्या शास्त्रज्ञांना भारत सरकारकडून लाखो रुपयांची संशोधन अनुदाने मिळालेली आहेत, म्हणून त्यांचेच फक्त बरोबर व इतर लोकांचे चूक असे होणार नाही.
दुवा क्र. ३ संस्कृत व आधुनिक संगणक प्रणाली (ऑबजेक्ट ओरीयंटेड) ह्यांची माहिती देतो. हा लेख सुधा ह्या भागातील विद्वान अभ्यासू मंडळींचा आहे.
दुवा ३
दुवा क्र. ४ संस्कृत व संगणक ह्या बद्दल माहिती देतो, आणी काही माहिती मान्यवर अमेरिकेतील संशोधन संस्थेने दिली आहे.
दुवा ४
वरील माहिती हि उदाहरणार्थ आहे. अशी बरीच माहिती मिळू शकेल.