मी ट्रेलरवरुन आणि IMDB च्या सर्वोत्कृष्ट २५० चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने पटकावलेले १६६ वे स्थान [मतांवर आधारित.  गॉन विथ द विंड (१६९) आणि द गोल्ड रश (१७३) या चित्रपटांच्या वरचे] या दोन गोष्टींवर विसंबून हा चित्रपट पाहिला.

सुरुवातीचा भाग चांगला आहे, परंतु नंतर "अर्थातच ह्या सिनेमाची मजा लुटायला लाज आणि डोके दोन्हीही घरी ठेवून जावे लागेल" या वाक्याची सत्यता पटू लागते. डोके घरी ठेवून चित्रपट पाहण्याची सवय आहे, पण त्याच जोडीला लाज विसरणे कठीण जाते. जितकी घटना अधिक विचित्र (weird) तितकी ती अधिक विनोदी, ही धारणा डोक्यात ठेवून पुढचे प्रसंग लिहिले\चित्रित केले आहेत. दोन पुरुषांनी हॉटेलमध्ये नग्नावस्थेत एकमेकांचा पाठलाग करणे किंवा चार भिंतीआड करायच्या काही गोष्टी खुलेआम करणे, यात विनोद शोधणे अवघड आहे. एक चांगली कल्पना/सुरुवात या अशा प्रसंगांमुळे वाया गेली आहे.

त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही, त्यांनी स्वतःला कृपया कमनशिबी समजू नये. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे.