सुखदाताई,
आपला लेख आवडला, संतांची शिकवण मनोगतींना समजावून सांगताना आपण मार्मिक उदाहरणे दिली आहेत. संस्कृत सुभाषितात संतसाहित्याप्रमाणेच  अशाप्रकारची अनेक उदाहरणे आढळतात. अहंकाराने माणसात दुर्गुणाचा शिरकाव होतो ते आपण सांगितलेच आहे.

पुरुषाला त्याच्या पराक्रमाचा गर्व, सुंदर स्त्रीला तिच्या सौंदर्याचा गर्व, विद्वानाला विद्वत्तेचा गर्व , धनवानाला धनाचा गर्व ही अहंकाराची नेहमी आढळणारी उदाहरणे आहेत.

आपण मात्र ही  नेहमी आढळणारी उदाहरणे न देता "मी गायन, वादन, लेखन, वक्तृत्व इत्यादी सर्व कला-गुणांत पारंगत आहे पण त्यापायी माझ्यात अहंकार शिगोशीग भरला आहे आणि दुसऱ्या कुणाला मी कायमच तुच्छ लेखते " हे उदाहरण दिले . त्यामुळे जरा आश्चर्य वाटले. याचे काही विशिष्ट कारण आहे का?