मिलिन्दराव,

पाणिनींनी संस्कृत भाषेचे व्याकरण नियमबद्ध (कोडिफाय() केलेले आहे. परंतु हे जे नियम बांधले आहेत, ते संस्कृत वाङ्मय पाळते, असे आपल्याला वाटते का ?

तुम्ही संस्कृत भाषेचे अलंकार संगणीकृत करत नसून संस्कृत भाषेचा उपयोग संगणक प्रज्ञावली तयार करण्या करता करणार असाल तर उपयोग होईल.

संस्कृत काव्यांत सर्वात जास्त घोळ आहे हे यापूर्वीही बऱ्याच लोकांनी मान्य केले आहे.

फक्त घोळाकडेच लक्ष का जाते? आणी घोळ म्हणजे नक्की काय? गावातल्या पारावरच्या गप्पांमध्ये हि चर्चा झाली का?

तांत्रिक स्टडीज ह्या जर्नलचे संशोधकांत काय रेप्यूटेशन आहे, हे माहित आहे का तुम्हाला?

मी दिलेले दुवे, हे उदाहरणार्थ आहेत हे लिहिले होते. असे अनेक उदाहरणे आहेत.  पाणिनींचे चूक, तांत्रिक स्टडीज चे चूक. पण तुमचे मात्र सर्व बरोबर हे कसे?

तुमचा आदर राखून नम्रपणे सांगावेसे वाटते -

मी पुरावे, दुवे ह्यांचा संदर्भ देऊन बोलतो, तसे, तुम्ही पुरावे देऊन का बोलत नाही? मी दिलेले दुवे पूर्ण न वाचताच वादघालण्यात काय शहाणपणा आहे?
तुम्ही अभ्यासपूर्ण वाचन करत नसल्याचे पुरावे आधीच दिले आहेत.

तुम्ही मोठ मोठ्या लोकांशी ओळखी असल्याचे सांगता पण तुमच्या बोलण्यातील मुद्द्याचे खरेपण काय?

मी सुद्धा म्हणू शकतो, मला बिल ने (बिल गेट्स) संस्कृत मधून त्याचा व्यवसाय करण्याचे मला दूरध्वनी वर सांगितले!!

मिलिन्द साहेब, पुराणातील वांगी प्रत्येकाला पचतील, रुचतील, समजतील असे नाही. कारण पुराणातील वांगी पचली असती तर तुमच्या भाषेत अहंकार आला नसता.  

आपली इच्छा असल्यास विषयांतर नको म्हणून व्य. नि. तुन चर्चा करण्यास ठीक आहे.

विषयाला धरून असेल तर येथेच चर्चा केली तरी चालेल.