प्रियाली,

क्रिकेटवर चालणारे (संपूर्ण) मराठी निवेदन अतिशय बेगडी वाटते असे माझे व्यक्तीगत मत आहे.

असे निश्चितच होऊ शकते, पण दुसऱ्या बाजूचा अनुभव मांडावा म्हणून लिहितो. मी लहानपणी मराठी कॉमेंट्री ऐकत असे, पण तेव्हा मला इंग्रजीचा गंधही नव्हता, तर मला त्यात काहीच बेगडी वाटत नसे. उलट मला ते सारे मराठी शब्द अतिशय नैसर्गिक वाटत असत (उदा. षटक, पायचीत, त्रिफळा, सीमापार, वगैरे). आता बरेच दिवसात क्रिकेट मराठीत ऐकले नाही, त्यामुळे आता कसे वाटेल कल्पना नाही.

पण, यामुळे असे वाटते की जरी मुळात प्रतिशब्द ओढून ताणून शोधले असतील तरी जो फक्त मराठीच ऐकतो वा वाचतो त्याला ते फार चुकीचे किंवा बेगडी वाटणार नाहीत.

आपला (धावचीत) इहलोकी.