बोलताना बोलते आहे असे पटकन म्हणताना बोलत्ये असे ऐकू येते, मात्र तो बोलते आहे हाच पटकन केलेला उच्चार असतो.

खरे आहे. मी एका तज्ज्ञांना ह्याबाबत विचारले. त्यांनी ग्रांथिक भाषेत 'नाहीये', 'करत्ये', 'बोलत्ये', 'झाल्ये'  असे लिहिणे चुकीचे आहे असे सांगितले. उदाहरणार्थ, हवामानशास्त्रावरील लेखांत, अकादमीय चर्चांत अशी भाषा वापरायला नको. हल्ली ही 'कंडेन्स्ड' किंवा आटवलेली रूपे वापरण्याची 'फॅशन' आली आहे, असेही ते म्हणाले. 'फमी द मोस्ट इम्पॉटंट थिंगीज़  इंटेग्रिटी' अशी वाक्ये इंग्रजीत लिहिता येत नाही.