काही जण असाही युक्तिवाद करतात "इंग्रजी शब्द भाषेत आले म्हणजे ती मराठी भाषा राहात नाही काय?"  नाही, ती मराठी नाही, ती संकरित (हायब्रीड) भाषा होते.

भाषाविज्ञानाने मराठीला  पिजिन(pidgin) ّّभाषाचच म्हटले आहे. थोडक्यात मराठी 'हायब्रीड' भाषा आहे. तीत संस्कृत,  देशी, फारसी,  अरबी, तुर्की असे अनेक भाषांतले शब्द आहेत. पिजिन भाषेचे शुद्ध रूप ते कुठले?

सध्या अल्सेशन कुत्रे लागले आहेत. कोणे एके काळी पर्शियन आणि अरबी कुत्रे लागले होते. भाषा सतत बदलत राहणार. तिच्यावर शुद्धता लादण्याचा प्रयत्न स्पृहणीय असला तरी तसा व्यर्थ आहे. कारण शेवटी बहुसंख्य मराठी भाषक जी भाषा बोलतील तीच भाषा जिवंत राहील, असे मला वाटते.