आपल्याला लेख आवडला हे वाचून बरे वाटले. धन्यवाद.
एकास एक संगती हा शब्द पाठ्यपुस्तकात वापरला गेला असेल तर तो प्रमाणित पारिभाषिक शब्द आहे. तेव्हा यापुढे मी तोच शब्द वापरत जाईन. व्यक्तिशः मला नातेसंबंध हा शब्द चांगला वाटतो. शिवाय मी आधी कुठेतरी म्हटल्याप्रमाणे मी हे सर्व महाविद्यालयात शिकले आहे. त्यामुळे त्यांचे मराठी प्रतिशब्द मला माहीत नाहीत. मी शिकत असताना दोन संचांमधील relation/ relationship असेच म्हटले जात असे असे स्मरते. त्यामुळेच मला नातेसंबंध शब्द वापरावासा वाटला असावा. असो. पण तरीही प्रमाणभाषा वापरली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.
काउंटेबल इन्फ़िनिटी बद्दल सर्किट यांनी दिलेले उत्तर पहावे. पुढील लेखांकात याविषयी थोडे विस्ताराने लिहिण्याचा मानस आहे.