यातील काही माहिती दुसऱ्या चर्चेतल्या लोकसत्तेतल्या दुव्यात होती, काही नवीन.
खरे आहे, पहिली बातमी वाचून हा फक्त स्त्रियांवरिल अत्याचार आहे असे बहुतेकांना वाटले होते पण आत्ता सत्य बाहेर आल्यावर लोकांची मते बदलली का?
खैरलांजी महाराष्ट्राच्या नकाशात नक्की कुठे आहे किती लोकांना माहित असेल?
खरं आहे ज्या गोष्टीचा आपल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही तिच्यावर काय आणि कितीवेळा चर्चा करणार? एकदा निषेध केला ना, संपलं.
शेवटी मी नि माझ्या जवळच्या लोकांवर याने परिणाम झालेला नसतो ना! पण आरक्षणाचा विषय येतो तेव्हा त्यात मी स्वतः हात पोळून घेतलेले असतात.
हे ही खरंच! आमच्यावर जातीव्यवस्थेचे दुष्परिणाम झालेत आणि काही ठिकाणी आमचे हात पोळले गेलेत म्हणून आम्हाला वाईट वाटतं, इतरांना ते सतत वाटावं हा आमचा अट्टाहास असू नये हे पटतं. म्हणूनच एका ठिकाणी चर्चा चालू असताना त्या विषयावर परत दुसरी चर्चा का करावी असं मी लिहीलं होतं.
मनोगतावर लिहिणारे बहुतांशी लोक उच्चशिक्षित आहेत. सगळ्यांना ते शिक्षण घेताना आरक्षणाचा 'अडथळा' ओलांडावा लागला असणार आहे. त्यामुळे तो विषय जास्त जिव्हाळ्याचा असणे साहजिक आहे असे मला वाटते.
खरं आहे. इथे सगळेच उच्च्शिक्षित हे आरक्षणाचा अडथळा ओलांडावे लागणारे = उच्चजातीय आहेत हे वाचून आनंद झाला.मनोगतावर जेव्हा बहुतांशी अल्पशिक्षित लोक येतील, ज्यांना जातीव्यवस्थेचे अडथळे पदोपदी जाणवलेले असतील तेव्हा त्याबाबतही जिव्हाळ्याने चर्चा होतीलच. आता अल्पशिक्षित लोक मनोगतावर येतील का हा एक प्रश्नच आहे.:)
थोडक्यात जो प्रश्न आपल्या जिव्हाळ्याचा नाही त्याबाबत जास्त गळे काढण्यात अर्थ नाही, एकदा निषेध करून आपण तो सोडून देऊ शकतो हे आपले म्हणणे मला पूर्णपणे पटलेले आहे.
खाली अत्यानंद यांनी म्हटलेले, 'या प्रतिक्रियांनी चर्चांनी काही साध्य होणार आहे का?' हे सुद्धा पटलेले आहे. (तसे इथल्या बऱ्याच चर्चा आणि लेखांत बरंच काही तावातावाने लिहीलं जातं त्यांनी काय साध्य होतं ?)
साती