मराठी भाषा स्वयंपूर्ण आहे, तिला दुसऱ्या भाषेच्या कुबड्यांची गरज नाही.

हे विधान अज्ञानमूलक आहे असे वाटते. 'कुबड्यांचे' आदानप्रदान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. संस्कृत भाषेतही द्राविडी शब्द आहेत. उदा. पूजातला 'पू' तमिळ आहे.
मराठीन दुसऱ्या भाषांच्या कुबड्या घेतल्या नाहीत काय?
उदाहरणार्थ:
    १.मला, तुला, त्याला मधला 'ला' हा प्रत्यय फारसीतल्या 'रा' ह्या प्रत्ययाचे मराठीकरण आहे.
    २. मराठीतले 'की' हे उभयान्वयी अव्यय फारसी भाषेतल्या 'के'चे मराठी रूप आहे.

आता 'ला' आणि 'की'शिवाय मराठी भाषा बोलून-लिहून बघा. सांगायचा उद्देश एवढाच, की कुठलीच भाषा कधीच स्वयंपूर्ण नसते. जी काळाबरोबर बदलते, लोकांना वापरावेसे वाटतील असे नवे शब्द स्वीकारते, घडवते ती भाषा जिवंत राहते.