प्रशासक यांस,

हा लेख मी २७ फेब्रुवारीस लिहिण्यास सुरुवात केली. अनेक दिवस कामातून सवड नं मिळाल्याने तो अर्धवट होता. आज मी तो पुर्ण करू शकलो. आणि आजच मी त्यास "प्रकाशित करण्यायोग्य" केले. परंतु त्याची तारीख अजुनही २७ फेब्रुवारी असल्याने तो लेख क्रमवारीत वर दिसत नाही.

"प्रकाशित करण्यायोग्य" केल्याची तारीख ही त्या लेखाची तारीख करता येईल काय? असे केल्यास नुकतेच प्रकाशित केलेले लेख क्रमवारीमध्ये "नवीन" म्हणून दिसू शकतील.

अमित चितळे