महेश यांनी दिलेली माहिती छान तर आहेच आणि उपयुक्तही.
संकल्प द्रविड यांनी केलेली सूचनाही फार मोलाची आहे. खरोखर मनोगतवर अशी कांही संदर्भ कोषिका निर्माण झाली तर फार उपयुक्त होईल. पूर्वी शाळेत वृत्त, गण मात्रा इ. लक्षांत ठेवण्यासाठीं उपयोगी पडतील अशा कांहीं ओळीही शिकवीत. आतां त्या फारशा आठवत नाहीत. तरीही शार्दूलविक्रीडिता संबधी एक ओळ आठवते. ती अशी -
येता मासजसातताग चरणी शार्दूलविक्रीडित
अशी संदर्भ कोषिका कोणी तयार करणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा.
महेशजी, धन्यवाद !