आमच्या लेकराला नक्कीच आवडेल हे गीत पण त्याही पेक्षा त्याच्या आजोबांना जास्त आवडेल. हे गीत पूर्वी ऐकलेले नाही पण खुपच छान आहे.

आमच्या घरी, सासर्‍यांच्या ''सर्वांनी फक्त दूधच प्यायले पाहिजे'' या अट्‍टाहासाला न जुमानता चहा पिणारी एकमात्र व्यक्ती म्हणजे अर्थातच सासुबाई... पण सध्या त्यांना ऑस्टियोपेनीयाचा ( हाडांची डेन्सिटी (घनता बहुतेक) कमी असणे) त्रास होवू लागल्याने '' सर्वांनी दूधच प्यावे आणि बायकांनी तर प्यायलेच पाहिजे'' या सासरेबुवांच्या मताला भयंकर धार चढलेली आहे. तरीही सासुबाईंची चहाची चहा काही कमी होण्यातली नाही. पक्क्या चहाबाजांचं असंच असतं. होय ना!