धन्यवाद ! अशा माझ्यासाठी तरी अवघड असणाऱ्या विषयावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता. विनायककाका, नामी_विलास यांच्यासारख्या लोकांइतका अभ्यास आणि वाचन नसल्याने अनेक उणीवा राहिल्या, अनेक गोष्टी फुलविता आल्या असत्या त्या जमल्या नाहीत. पण तरीही लेख वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार !
सर्कीटराव,
आपल्याला असे म्हणायचे आहे का की किशोरीताईंचे वागणे कौतुकास्पद आहे ?
पण ह्यामुळे त्यांचे कलागुण माझ्या लेखी तरी मातीमोल अजीबात ठरत नाहीत.
कलागुण मातीमोल ठरणे याचा अर्थ गुणांच्या जोरावर ती व्यक्ती उच्चपदाला पोचते, इतरांसाठी आदरणीय ठरते. मात्र जोडीला अहंकार असला तर त्या 'व्यक्ती'बद्दल तितकाच आदर राहणार नाही. आत्ताच तुम्ही किशोरीताई काय सुंदर गातात म्हणून कौतुक केले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांचा अहंकार दाखवून देऊन त्यांना खाली खेचले !
फक्त अहंकार आहे म्हणून एखाद्याच्या इतर गुणांकडे दुर्लक्ष करायचे हे मला पटत नाही.
लेखात लिहिल्याप्रमाणे अहंकार एकटा येत नाही येताना अनेक वाईट गोष्टी उदा. राग, हाव (प्रसिद्धीची, मोठेपणाची), मत्सर, दुसऱ्याचे वाईट चिंतणे, कुचेष्टा करणे इ. इ. घेऊन येतो. आणि तरीही तुम्ही म्हणता की अशा अहंकाराकडे दुर्लक्ष करावे ?
हा एक अवगुण गाळण्याइतके आपण मॅच्युअर नाही काय
आपल्याला अहंकार झाला आहे हे ओळखण्याएव्हढे, अहंकारावर काबू मिळविण्याएव्हढे, निदान प्रयत्न करण्याएव्हढे आपण मॅच्युअर नाही काय ?
सर्व सद्गुणांचा पुतळा कुणीही नसतो.
मी तर सोडाच हो पण कुठल्याही संतांनी असे कुठेही म्हटलेले नाही.
(आपल्या परंपरेत देवांच्या अवगुणांना देखील लपवून ठेवलेले नाही.)
जी गोष्ट अस्तित्वात आहे किंवा नाही हेच छातीठोकपणे सांगता येत नाही त्याबद्दल काय बोलणार ! अवगुण लपवून न ठेवण्याचे कारणच ते लोकांना दिसावेत आणि त्यावरून लोकांनी 'योग्य' तो बोध घ्यावा असे असावे. 'नारद' अतिशय विद्वान होता पण त्याचा उल्लेख त्याच्या विद्वत्तेपेक्षा त्याच्या 'कळलाव्या' स्वभावामुळे जास्त होतो असे आपल्याला वाटत नाही का ? आता आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर मधे मनोगतावर राम वि. रावण अशी चर्चा झाली होती आणि त्यात रामाने एका परिटाचे ऐकून सीतेला हाकलून दिले यामुळे राम, रावणापेक्षा कनिष्ठ असे मत बऱ्याच जणांनी मांडले. थोडक्यात काय ? या एका कृतीसाठी आपण रामाच्या इतर सर्व गुणांची काय किंमत केली ?
त्यामुळे एखाद्याचा एक अवगुण दिसल्यास त्याच्या इतर सर्व गुणांचा काहीही उपयोग नाही, हे आपल्या परंपरेच्या आणि विचारसरणीच्या विरुद्ध नाही का ?
अजिबात नाही. आपल्याच परंपरेत किंवा विचारसरणीत 'विद्या विनयेन शोभते' असे म्हटले आहे ना ?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहंकार असण्यामुळे कोणाचा आदर संपण्यापेक्षा अहंकार असल्याचे कबूल करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न न करता 'मी काही सद्गुणाचा पुतळा नाही. आहे मला अहंकार ! असू देत ! कोणाला काय वाटायचे ते वाटू देत मला फरक पडत नाही ' असे स्वतःचेच कौतुक करणे यामुळे मात्र निश्चितच संपेल.
प्रियालीताई, वाचता वाचता एकसारखे श्लोक, रचना समोर येत गेले आणि मग त्या विषयाशी संबंधित आणखी रचना शोधण्याची इच्छा झाली.
जी. जि.,
आपण मात्र ही नेहमी आढळणारी उदाहरणे न देता "मी गायन, वादन, लेखन, वक्तृत्व इत्यादी सर्व कला-गुणांत पारंगत आहे पण त्यापायी माझ्यात अहंकार शिगोशीग भरला आहे आणि दुसऱ्या कुणाला मी कायमच तुच्छ लेखते " हे उदाहरण दिले .
गायक, वादक, लेखक, वक्ता हे विद्वान नसतात असे आपल्याला सुचवायचे आहे का ? सर्कीटरावांनी वर किशोरीताईंचे उदाहरण दिले आहे ते वाचले नाहीत का ?
त्यामुळे जरा आश्चर्य वाटले. याचे काही विशिष्ट कारण आहे का?
आपला प्रश्न नीट समजला नाही.
सुमीत,
तुमचा अभ्यास दांडगा आहे
अभ्यास दांडगा नाही. अचानक या रचना समोर आल्या आणि लिहिणे सुचत गेले.
मीराताई,
पण लक्षात कोण घेतो?
पटते. तुकारामांचा हा अभंग वाचल्यावर तर डोळे उघडले.
आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।