चित्त, मी चुकलो! ही चर्चा राखी, अंतरा माळीचे आरोग़्य, रागोवर्मा इ महत्त्वाच्या विषयावर होती हे मी विसरलोच होतो. तसेच विषयांतराची गोडी वेगळी असते हे भानही ठेवावयास हवे होते. उगाच गुलजारचे काव्य,मराठी भाषा वगैरे बद्दल लिहून विषयांतर केले व 'ऱंगभंगाची चळवळ' सुरु केली.गुस्ताखी हो गयी, जनाब! आगेसे नही होगी. मला इ-मुआफी द्यावी.
मलाही आता 'अपनी हालात पे खुद ही हंसी आती है'...!

जयंतराव तुमची पोटतिडीक समजली. माझ्या मते, विषयांतर होते आहे असे म्हणताना विषयांतरच होते. असे विषयांतराला खतपाणी घालण्यापेक्षा आपण आपले मुद्द्याला धरून लिहीत राहावे. ज्याला विषयांतर करायचे आहे तो करीलच. चर्चेत हलकेपणा नको, पण हलके-फुलके विषयांतर झाल्यास वाईट नाही. असो. सर्किटरावांना मी तसा प्रतिसाद द्यायला नको होता. क्षमस्व.