प्रस्तुत चर्चाविषय हा अशा मराठीवर किंवा मराठी असे होण्यापासून वाचवण्यावर उपाय काय, असा आहे वाटते. कोणाला काही उपाय सुचत असेल तर तो वाचायला आवडेल.

डॉ. ग. ना. जोगळेकरांनी भाषेच्या उपयोग संदर्भात तीन गोष्टींची चर्चा "मराठी भाषेचा इतिहास" मध्ये केल्याचे आठवते. एक तर बोली भाषा म्हणून अस्तित्व, व्यवहार भाषा म्हणून अस्तित्व तिसरे म्हणजे ज्ञान भाषा म्हणून अस्तित्व . मला वाटते ही चर्चा बोली भाषा म्हणून मराठीचे अस्तित्व या विषयापर्यंत मर्यादित आहे.

हिंदीचा राष्ट्रभाषा या नात्याने व्यवहार भाषा म्हणून वापर मान्य केला, इंग्रजीचा आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषा म्हणून वापर मान्य केला तरी त्यांचा बोली भाषेत उपयोग व्हावा की नाही झाला तर तो किती व्हावा हा बहुधा वादाचा मुद्दा आहे. असा वाद भाषा शुद्धीकरण चळवळी बद्दल बराच पूर्वी होऊन गेला आहे-

दुवा

हा दुवा देण्याचा उद्देश असा की मराठीच्या इतिहासात होऊन गेलेली चर्चा पुन्हा उगाळली जाण्यापेक्षा काही नवे मुद्दे उपाय मिळू शकले तर बरे होईल. 

 

या चर्चेची दुसरी मर्यादा कोणतेही चर्चीले जाणारे उपाय  मनोगतींपुरती वैयक्तिक पातळीवर त्यांच्या इच्छेवर आणि इच्छाशक्तीवर अवलंबून राहणार आहेत.

 

लहानपणी मिळणारे संस्कार दूरगामी असतात.अमेरिकेला आपल्या नातवास वाढदिवसाची भेट म्हणून एका आजीने  "जिंगल टून्स" नावाच्या औरंगाबादेच्या कंपनीच्या लहान मुलांकरता असलेल्या बऱ्याच व्हीसिडी नेल्याचे आठवते. कार्टून्स आणि गाणी मराठीत असतील तर खूप प्रभावशाली ठरतील असे वाटते. लोकानुनया करिता इतर गिफ्ट द्या पण पूर्वी जर तुम्हाला लहान मुलांना मराठी पुस्तक भेट देण्याची सवय असेल तर त्या ऐवजी किंवा सोबत या व्हीसीडींचा सुद्धा समावेश करा.

 बाकी इंग्रजी विकिपीडिया चाळल्यानंतर फ्रेंच आणि इंग्रजी शिवाय इतर युरोपीय भाषांसमोर ही मराठी समोर असावेत त्याच स्वरूपाचे प्रश्न उपस्थित असल्याचे दिसून येते. पण उपायांमध्ये फ्रेंच सरकारने जाहिरातीमध्ये फ्रेंच शब्द सुद्धा असावेत आणि जनतेच्या भावनिक उद्रेकाचा परिणाम म्हणून रस्त्यावरचे नाम फलकांवर फ्रेंच आवश्यक केल्याचे दिसून येते. कौंसिल ऑफ युरोपचे चार्टर पण आहे -http://conventions.coe.int/treaty/en/Treaties/Html/148.htm दुवा.

दुवा 

  पण हे सर्व उपाय आपल्या कडच्या शासकीय उपायांप्रमाणे जुजबी भासतात.

शेवटी बोलणारा आणि ऐकणारा/वाचणारा राजी असेल तर काझी काय करेल?

-विकिकर

ता.क. : आजच्या वृत्तपत्रात पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरूंच्या अध्यक्षते खाली ज्ञान भाषा संदर्भातील काही नवीन योजनांचा उल्लेख आहे ,कुणाला शक्य असेल तर दुवा द्यावा.