आधीची " "खैरलांजी" हि बातमी तुम्ही कशी वाचली दुवा " ही चर्चा मी स्वतः चालू केली होती . त्या चर्चेला जवढे प्रतिसाद मिळाले त्यावरून "चर्चा अनुल्लेखाने मारली जाते " या साती ताईंच्या म्हणण्यात तथ्य नाही.
ज्या व्यक्तिने आधीच्या चर्चेत सहभाग नोंदवला आहे, त्याला हि चर्चा पुन्हा नव्याने का केली जात आहे ह्याचा बोध या दुसऱ्या चर्चेच्या शीर्षकातून होत नाही."खैरलांजी काही नवी तथ्ये" अशा स्वरूपाच शिर्षक कदाचित अधिक उपयुक्त ठरल असत. खरेतर माझ्या आधीच्या चर्चेत फक्त दुवा दिलेला आहे तरी सुद्धा बातमी वाचण्याच सौजन्य मनोगतींनी दाखवल हे मी मान्य करतो. माझेही मनोगतावर काही चर्चा विषय फसले आहेत. प्रतिसाद आला नाही तर कुणा कुणाला त्रागा होणे स्वाभाविक आहे. पण प्रसिद्धी हे एक तंत्र असत ते एखाद वेळेस फसल तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने वापरता येतच.
मनोगती वाचकांच अजून एक वैशिष्ट्य नमूद करण्या सारख असत कि चर्चेस आलेल्या विषयास किती प्रतिसाद आले आहेत हे बाहेरूनच समजतं. प्रतिसादांची संख्या कमी आढळली तर लोक विषय उघडून पण पहात नाहीत. यात विषयाच्या महत्त्वाचा संबध कमी आहे. आणि समुहाची मानसिकता महत्त्वाची आहे जस रस्त्यावरच्या एखाद्या खड्ड्या पाशी नाहक लोक उभे असले तरी तीथे गर्दी होते. आणि इतर असंख्य इतर खड्डे दुर्लक्षीत होतात.
त्याच बातम्या वाचताना सारख्याच शिर्षकाची आणि धाटणीची बातमीकडे सामान्यांचही दुर्लक्ष होत. बातमीच गांभीर्य माहीत असून सुद्धा काश्मीरच्या किंवा बिहारातल्या सर्व बातम्या आपण वाचत नाही.
कदाचित साती ताईंनी प्रतिसाद नोंदवला नसतातर इतरांच या चर्चे कडे लक्ष गेल असतच असही नाही.हि बातमी वाचण सयुक्तिक आहे यात शंका नाही, तेव्हा साती ताईंचे आणि शिरूरकरांचे लक्षवेधल्या बद्दल धन्यवाद.
*विषयांतरा बद्दल क्षमस्व
-ऌऋ
खैरलांजी मधील अनुस्वाराची जागा अनवधानाने राहिली दिसते .त्यामुळे का काय "या वरून आठवलं" खिडकीत आधीच्या चर्चेचा दुवा हाती लागत नाही ?