इतका वेळ यावर एकही प्रतिसाद लिहीला गेला नाही यावरून तुम्हाला कळले असेलच लोकांना किती आस्था आहे या प्रकरणाबाबत.
तुमच्या पहिल्या प्रतिसादातही विषयांतर कशासाठी? इतरांनी प्रतिसाद दिला
नाही म्हणून त्यांच्यावर ताशेरे ओढण्यापेक्षा तुम्ही तुमचे मत तेव्हा का
मांडले नाही?
माफ करा, पण प्रतिसाद दिला नाही म्हणजे आस्था नाही हे तुम्ही कसे ठरवता?
माझे आहे पण तुमच्या आस्थांशी सगळ्यांचे 'अलाइनमेंट' हवेच का? मनोगतासारख्या आभासी माध्यमावर अशा चर्चा टाळणे बरे असते. मनस्ताप वाचतो, असा माझा अनुभव आहे. म्हणून त्यात न गुंतलेले बरे.
उगाच असले विषय इथे लिहू नका, त्यापेक्षा आपण संतसाहित्य, साहित्यातला लुसलुशीतपणा वगैरे छान छान चर्चा करू.
सातीताई, त्या छान छान चर्चांनी त्यांनी
तुमचे काय घोडे मारले? 'एकनॉमिक एँड पलिटिकल वीकली'चा दुवा तुम्हाला द्यायलाच हवा.
असो, मुद्याकडे वळायला हवे.गेल्या काही महिन्यातला घटनाक्रम बघितला की काही गोष्टी मनात येतात.
इतरवेळी बामनांना शिव्या देणारे बहुजन समाजाचे (म्हणजे
देशमुख-मराठा-कुणबी) आणि त्यांच्या 'पुरोगामी' ब्रिगेडा अशावेळी गप्प का? हे लोक
बामनांनाही शिव्या देतात आणि दलितांनाही. हा पहिला
मुद्दा. तुम्ही त्यांच्या आस्थेला का बरे प्रश्नांकित केले नाही?
दुसरा मुद्दा, दोन महिने सारे कसे चिडीचूप
होते. अचानक झालेल्या उद्रेकामागे कुठले आणि कोणाचे राजकारण आहे? दलितांना
भडकायचे नाही, गप्प बसायचे असे मला मुळीच सुचवायचे नाही. कुणी तसा
सोयीस्कर अर्थ काढू नये.
विदर्भातले दलित संघटित आणि सशक्त आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या दलितांसारखे दबून राहणारे नाही. तिथेही अशी घटना व्हावी ह्याचे फार वाईट वाटले. पण ह्या 'स्वयंस्फूर्त' भडक्यामागे राजकारणदेखील
आहे हे नक्की. नगरपालिकांच्या, महानगरपालिंकाच्या निवडणुका जवळच आहेत.
चित्तरंजन