१) स्पॅनिश लोक "र" चा उच्चार स्पष्टपणे करतात. इथल्या निवासी मराठी गृहस्थांकडून असे कळले की स्पॅनिश लोकांना, जगांत फक्त आपल्यालाच "र" हे अक्षर उच्चारता येते असा (अज्ञानमूलक) अभिमान आहे. त्या (मराठी) गृहस्थांनी अर्थातच त्यांच्या संपर्कांत येणाऱ्या स्पॅनिश माणसांचा तो गैरसमज दूर केला आहे.

अज्ञानमूलक हे खरेच पण स्पॅनिशमध्ये 'र' चा उच्चार 'र' असा न होता 'र्र' असा होतो आणि तसा उच्चार इतर बऱ्याच युरोपिअन किंवा अमेरिकन माणसांना करता येत नाही असा त्यांचा ग्रह असतो.  जसा कुत्र्याला एल पेर्रो म्हटले जाते. आपल्याला हा उच्चार करता येतो कारण मराठीत अर्रर्र!!!, किर्र! कर्र अशा शब्दांचा वापर केला जातो.

स्पॅनिश भाषेतील वर्णमालेत R आणि RR अशी दोन व्यंजने येतात असे वाचले आहे.

चू. भू. दे. घे.

असो. स्पॅनिश ही इंडो-युरोपिअन भाषा गणली गेल्याने तिच्यात व भारतीय भाषांत साम्य असणे स्वाभावीक आहे.

(डोरा-द-एक्स्प्लोरर) प्रियाली