मळमळयुक्त वैतागाची भावना निर्माण होते
>>चक्रपाणि, आपल्याला आमच्यामुळे त्रास झाला; क्षमा असावी.
आपण आमचे पुढील रसग्रहण वाचणार असाल तर धोक्याची सूचना: आपण आपल्या मळमळीवर योग्य औषध घेऊनच ते वाचावे. प्रकृतीला जपा.
वाचकांना वेगवेगळे अर्थ लवकर सापडावे हा आमचा क्रमांक देण्यामागील हेतू होता. कित्येक वाचकांना शोधून वाचावे लागले, पाल्हाळिक असले तर वाचावेसेच वाटत नाही असा आमचा आजवरचा अनुभव.
आपल्या प्रतिसादाने नवीनच माहिती मिळाली. आदर्श उत्तरपत्रिकेचा राग आम्हालाही येत असे. दहावी बारावीला दिलेले अवाजवी महत्त्व हेच याचे कारण असू शकेल.
कित्येकदा भूतकाळातील कटू स्मृती माणसाला वर्तमानही नीट जगू देत नाहीत किंवा काही माणसे भूतकाळाच्या अशा आठवणींचे वारंवार भांडवल करतात असा आमचा अनुभव आहे. आपला स्वभाव असा नसेलही. आम्ही क्रमांक द्यावे यासाठी आपण एक उदाहरण दिले असे आम्ही समजतो. आपण स्वतःला जपावे.