>>चक्रपाणि, आपल्याला आमच्यामुळे त्रास झाला; क्षमा असावी.
--- असा आपला गैरसमज़ झालेला दिसतो जीजि. आम्हाला कसलाही त्रास झालेला नाही.
आपण आमचे पुढील रसग्रहण वाचणार असाल तर धोक्याची सूचना: आपण आपल्या मळमळीवर योग्य औषध घेऊनच ते वाचावे. प्रकृतीला जपा
--- आम्ही कोणी लिहिले आहे हे न पाहता, काय लिहिले आहे हे पाहून प्रतिसाद देत असल्याने तुम्ही काहीही लिहिले तरी आम्ही वाचूच...प्रतिसाद देणे न देणे हे तुम्ही सुचवलेले औषध किती प्रभावी ठरते त्यावर अवलंबून राहील. आपण मात्र अशी धोक्याची सूचना देऊन आपले रसग्रहण आमच्यासाठी नेहमीच मळमळयुक्त वैतागवाडी ठरेल, असे सूतोवाच तर करू इच्छित नाही ना?
वाचकांना वेगवेगळे अर्थ लवकर सापडावे हा आमचा क्रमांक देण्यामागील हेतू होता. कित्येक वाचकांना शोधून वाचावे लागले, पाल्हाळिक असले तर वाचावेसेच वाटत नाही असा आमचा आजवरचा अनुभव.
--- हेतू आणि पाल्हाळाशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. मात्र आपल्या सुंदर रसग्रहणास दहावीच्या विज्ञान १ किंवा विज्ञान २ च्या उत्तरपत्रिकांचे रंग येऊ नयेत, अशी भाबडी इच्छा होती, म्हणून सूचना केली होती. पण एकूण मराठीचा पेपर विज्ञानाच्या पेपराच्या शैलीत लिहू नये, हे आपणांस रुचले नाही, असे दिसते.
आम्ही क्रमांक द्यावे यासाठी आपण एक उदाहरण दिले असे आम्ही समजतो.
--- हा आणखी एक गैरसमज़ झाला जीजि. तुम्ही क्रमांक देऊ नये, यासाठी मी एक उदाहरण दिले होते.
आपण स्वतःला जपावे.
--- मागील प्रतिसादात ह. घ्या. लिहिण्याचे विसरलो की काय असे आम्हांस वाटते. त्या विसराळूपणाबद्दल आम्हांला आपल्या प्रतिसादाचे इतके ज़ालीम औषध मिळणार हे माहीत असते, तर ह. घ्या. हे त्या प्रतिसादात ठळकावले असते. असो. चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून
ह. घ्या.