प्रथमच एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर मी बऱ्याचदा सहज मजेने हाय/हॅलो ऐवजी 'नमस्कार' असं म्हणतो. बहुतेक मुलं प्रत्युत्तरादाखल परत 'नमस्कार' म्हणतात. पण आत्तापर्यंत एकाही मुलीला ते आवडलेलं दिसलं नाही. सर्व मुलींची प्रतिक्रिया अशा असतात,

"ईईई... नमस्कार वगैरे... प्लीज!"

"ईईई... काहीही काय?"

"ईईई... त्यापेक्षा मराठीत हॅलो म्हण की" (वर खीखीखी... असं हास्य)

"ई! काहीतरीच काय?"

"ई... असं अगदी प्रौढ असल्यासारखं नको बोलूस हं."

"हे नमस्कार वगैरे काय? काहीतरीच वाटतं..."

किंवा असं वाक्य आलं नाही तर निदान "किती बॅकवर्ड आहे!" असा एक तुच्छतादर्शक भाव चेहेऱ्यावर उमटतो.

(या सर्व मराठी मुलींच्याच प्रतिक्रिया आहेत)

 

यावरुन मी इथे कोणतेही अनुमान काढत नाही. आपल्याला वाटेल तो बोध घ्यावा.