कॉम्प्लेक्स नंबर्सना मिश्र संख्या चालेल का? अशा संख्यांचा एक भाग वास्तव (रिअल) संख्या तर दुसरा काल्पनिक संख्या (इमॅजनरी) असतो. त्यामुळे भिन्न संख्याप्रकारांच्या अशा मिश्रणातून घडलेले नंबर्स म्हणून ते मिश्र संख्या असे म्हटले तर?

पुष्ट्यर्थ - ऑप्टिमायझेशन तंत्रामध्ये मिक्स्ड इंटिजर लिनिअर प्रोग्रॅमिंग नावाचा ज़ो प्रकार आहे, त्यात नैसर्गिक आणि पूर्णांक अशा दोन्ही संख्याप्रकारांचे मिश्रण एकत्र हाताळले ज़ाते. त्यावरूनच या तंत्रास मिक्स्ड इंटिजर लिनिअर प्रोग्रॅमिंग असे नाव पडले. अशा दोन भिन्न संख्याप्रकारांच्या एकत्रित अस्तित्त्वातूनच कॉम्प्लेक्स नंबर्सनाही मिश्र संख्या म्हणता येईलसे वाटले.