मराठी ही मुळातूनच मिश्रणाची भाषा आहे. संस्कृत शब्द सोडले तरी कित्येक मराठी शब्द 'परभाषीय' म्हणजे फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले आहेत.

हे मला नवीन आहे. फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले शब्द आणि मराठी भाषेत त्या शब्दाला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.

मराठी तमिळमधून उद्भवली असा खैरेंचा सिद्धांतही आहेच.
माझ्या माहिती प्रमाणे मराठीचा उगम संस्कृत पासून आहे. असो, येथे मराठीचा उगम हा मुद्दा नसल्याने त्यावर जास्त बोलणे विषयांतर होईल.

इंग्रजीत मराठीपेक्षा जास्त शब्द आहेत.

हे मला नवीन आहे.

मूळ इंग्रजी भाषेत शब्द आहेत, पण मराठीत त्याला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.

इंग्रजीत जास्त साहित्य लिहिले जाते

माफ करा, पण फक्त साहित्य जास्त लिहिले जाते म्हणजे भाषा उत्तम आहे हि विचार सरणी जरा उथळ वाटते.

साहित्य जास्त लिहीण्या मागे अनेक कारणे असू शकतात. मराठी भाषिकाची संख्या किती आणि इंग्रजी भाषिकाची संख्या किती? साक्षर मराठी लोक किती आणी साक्षर इंग्रजी लोक किती असे अनेक वादाचे मुद्दे उपस्थित होतील. तसेच हे विषयांतर होण्याची शक्यता आहे.

खरा मुद्दा असा आहे की भाषेतील बदल सावकाश झाले तर ते भाषेशी एकरूप होतात.

माझा मुद्दा असा होता, की भाषे बरोबर, आपली संस्कृती सुद्धा ईंग्लीशाळेल.

त्यासाठी सोपा उपाय म्हणजे जमतील तिथे मराठी शब्द वापरणे. व इंग्रजी शब्द वापरताना त्यांचे मराठीकरण करणे. उदा. टेबलवर ऐवजी टेबलावर, बॅगमध्ये ऐवजी बॅगेत वगैरे.

येथे प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते.
माझ्या मते असे इंग्लिश वापरात आले तर ज्या लोकांना परदेशातील इंग्रजी लोकांशी बोलण्याचा, भेटण्याचा प्रसंग येतो, त्यांना भलतीच अडचण होईल.
ह्या लोकांचे ईंग्रजी सुद्धा बिघडुन जाईल.म्हणजे, ना धड इंग्लिश ना धड मराठी अशी बिकट अवस्था होऊन बसेल.

माझ्या मते, सोपा उपाय म्हणजे, मराठी हि मराठी सारखी, मराठीमध्ये बोलावी.

अवांतर: मी अमेरिकेत नवीन असताना झालेला किस्सा :

एक भारतीय सहकारी, मराठी वाक्य 'बायको माझे डोकं खाते' हे त्याचे रडगाणे एका अमेरिकन सहकाऱ्याला 'माय वाइफ ईज ईटिंग माय हेड' ह्या शब्दात सांगत होता.. आणि त्या अमेरिकन माणसाचे 'ऑ' केलेले तोंड मी अजूनही विसरू शकत नाही.