ही बातमी आणि अपेक्षित चर्चा लांबच राहीली, आणि साती यांनी (माफ करा, पण) निव्वळ आकसाने लिहायला सुरवात केल्यामुळे, सदर चर्चा, ही या विषयावर चर्चा का होत नाही यावरच चालू झाली आहे. यात सातींना नक्की काय मिळत आहे ते त्याच सांगू शकतील. पण मला असे वाटू लागले आहे की त्यांना सदर विषयात रस नसून त्या विषयाचा फायदा घेऊन सर्व "तथाकथीत" सवर्ण समाज हा दलीतांकडे दुर्लक्ष कसे करत आहे हा द्वेष उगाळत ठेवायचा आहे.  वास्तवीक आपल्या पिढीत निदान शहरी आणि महाराष्ट्राततरी बऱ्याच ठिकाणि ह्या गोष्टि बदलल्या आहेत आणि बदलत आहेत. पुर्वीच्या पिढ्यांमधे (आणि त्या बाबतीतही निदान आमच्याकडे मी अगदी माझ्या आजी-आजोबांकडूनहि बघितलेला नाही) जो काही त्रास हा दलीतांना दिला गेला तो अक्षम्य आहे. पण म्हणून आम्ही काही केले नसताना देखील  कुठल्याही कारणावरून  अपराधी ठरवण्याचा  हा काय प्रकार आहे?

जर मी वर लिहीलेले चुकीचे असेल तर सातींनी काही गोष्टी स्पष्ट कराव्यात:

  1. नक्की खैरलांजी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतय?
  2. तुम्ही तर शिकलेल्या (उच्चविद्याभूषित) दिसताय, मग तुम्ही नक्की दलीतांसाठी काय करत आहात? (तथाकथीत सवर्णांवर टिका करणे सोडून)
  3. काही सकारात्मक विचार करून प्रश्नांना उत्तरे शोधण्याची तुम्हाला इच्छा असते का? असल्यास जे काही प्रश्न वाटतात त्यावर सकारत्मक चर्चा घडवून आणा - उगाच आकस आणू नका..

न पेक्षा संपूर्ण समाजाला केवळ त्यातले काही दलीत नाहीत म्हणून टिका करणारे प्रतिसाद हे निदान मनोगतावरून तरी प्रशासकांनी तसे जाहीर सांगून काढून टाकावेत ही विनंती. कारण वैयक्तीक टीके सारखीच अशा प्रकारची बिनबुडाची सामाजीक टिका हि अक्षम्य आहे.

धन्यवाद.