नमस्कार,

काल खैरलांजीच्या नावावर अमरावती पेटवण्यात आले. कॅम्प ते दयासागर आणि ईर्वीनचौका पर्यंत सगळ्या रहीवासी घरांवर दगडफेक करून घरांची तोडफोड करण्यात आली.

या रहिवाश्यांचा खैरलांजी प्रकरणी काय दोष? हे खैरलांजीतही नाहीत आणि सरकारातही नाहीत. मात्र आंबेडकरी जनते बद्दल आयुष्यभर जपाव्या अश्या आठवणी मात्र 'आता' यांच्या जवळ आहेत.

उद्या आपण यांच्याजवळ जाणार आणि हे आम्हाला समतेची(?) वागणूक देत नाही म्हणून आरोप करणार. हे कितपत योग्य? आम्ही आंबेडकरी विचाराशी बांधीलकी सांगणारे युवक या समाजाला आपला कधी मानणार आहोत?

या सरकाराला वठणीवर आणण्यासाठी आपल्याच समाजाला वेठीस धरण्याचे दृष्कृत्य कधी पर्यंत करणार आहोत? 

नीलकांत