या प्रकरणाचे लोण महाराष्ट्रात पसरत चालले आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व कोणताही राजकीय पक्ष करत नाही आहे.
म्हणायला गेल्यास बहुतेकांना दलित समाजाला देण्यात येणारे आरक्षण खटकते हे ही एक कारण सवर्णांत दलित समाजाविषयी आहे. तसेच सध्याचे राजकारण (दलितांचे) नेतृत्व हिन आहे. सतत कॉग्रेस,रा.कॉंग्रेस यांच्याकडे झुकलेले हे नेतृत्व. यांचे अस्तित्व दिसतच नाही. त्यामुळे खैरलांजी प्रकरणामुळे का होईना दलितांमधली एकजुट दिसुन आली. ताकद दिसली. जे झाल ते वाईटच झाल. आज शिवाजी महाराज ,महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर,शाहूमहाराज यांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात असे घडते याचा अर्थ तो काय. याचा अर्थ एकच यांचे विचार महाराष्ट्रात पुर्णपणे रुजलेच नाहीत. हे खेदजनक आहे.
आपला
कॉ.विकि