चांगली गझल आहे. मागच्या गझलेप्रमाणेच सहज आणि प्रासादिक. तुम्ही गझलेत मुरलेले दिसता.


तुझे मित्र व्हावे तुझ्या दुश्मनांनी
जगावेगळे हे जगावे जरा तू
वाव्वा.

हा शेर विशेष आवडला. गझलेत विचार आणि कल्पना नव्या असायलाच हव्यात असे नाही. पण उत्तम लहजा(टोन ऑफ़ वॉइस), प्रासादिकताही त्या गझलेला वेगळे करू शकतात, ह्याचे चांगले उदाहरण. पण गझलेतील वृत्तांतात्मकता कमी करता आल्यास उत्तम.