फक्त साहित्य जास्त लिहिले जाते म्हणजे भाषा उत्तम आहे हि विचार सरणी जरा उथळ वाटते.

तशी तुलना चुकीची आहे. प्रत्येक भाषा आपल्या जागी सुंदर असते.

हे आधी म्हटलेच आहे. माझा मुद्दा असा होता की इंग्रजी फुसकी आहे म्हणून वापरू नये असे म्हणण्यात काही अर्थ नाही.

काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.

मला नेहमी अडणारे शब्द अपील, लेबल, कॅमेरा, जनरल इ. तसेच मराठीतून इंग्रजीत न पाठवता येणारा नुकताच अडलेला शब्द खाऊ ..! असो. पुन्हा तेच म्हणते की यातून ते आणि त्यातून हे असा भाषांतराचा मुद्दा नाही.

परदेशातील इंग्रजी लोकांशी बोलण्याचा, भेटण्याचा प्रसंग येतो, त्यांना भलतीच अडचण होईल.

तसेही अमेरिकनांचे इंग्रजी आणि इंग्रजांचे इंग्रजी या दोन शाखा वेगळ्या आहेतच, त्यात एक आणखी म्हणजे भारतीयांचे इंग्रजी. माझी फ्रेंच मैत्रिण आरामात फ्रेंच म्हणींचे, वाक्प्रचारांचे इंग्रजी भाषांतर करत असे. आमचाही अनेकदा 'आ' होत असे. पण त्यातूनच भाषा वाढते.

ईटिंग माय हेड'

भाषांतरात काहीच वाईट नाही. उदा. उच्चभ्रू हा मराठीतला आपला वाटणारा शब्द इंग्रजी हायब्रोचे भाषांतर आहे. नाहीतर भुवया (भ्रू) उंचावण्याची मराठी अभिजनांत काही परंपरा नाही.