नमस्कार,
जय महाराष्ट्र !
दै. सकाळ (१४ नोव्हेंबर २००६ )ने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे त्यांनीच केलेल्या अंदाजानुसार.
येत्या मं. न. पा. निवडणुकीत सत्तेचे गणित ठरवणार आहेत उत्तर प्रदेशी,बिहारी . यांत ३०% हिंदी भाषक, मराठी -गुजराती २५%, राज्यातील ४८% सेवा परप्रांतीयांवर अवलंबून आहेत .
उत्तर प्रदेश -बिहार मधून आलेल्या भैयांच्या मुंबईतील अस्तित्वाबद्दल मराठी माणसाने कितीही ओरड केली तरी आमची मुंबई हाती लागण्यासाठी परप्रांतियांची भुमिका महत्त्वाची झाली.
आता वरील बातमीतुन आपण काय विचार करु शकतो ?
परप्रांतीयांना मुंबईत आसरा देणारे कोण व कसे?
येत्या काही वर्षात मराठी माणसाची मुंबईतुन हद्दपारी होईल का?
या सर्वांना जवाबदार कोण? उदा. मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत.
आपला
कॉ.विकि