मला नेहमी अडणारे शब्द अपील, लेबल, कॅमेरा, जनरल इ. तसेच मराठीतून इंग्रजीत न पाठवता येणारा नुकताच अडलेला शब्द खाऊ ..!

तुम्हाला, मला अडणारे शब्द आपण इंग्रजीत वापरतो, म्हणजे, मराठीत त्याला शब्द नाही असे म्हणता येणार नाही. मराठीत शब्द आहेत, पण आपण वापरत नाही. हि मराठी भाषेची कमतरता किंवा उणेपणा नाही.

पुन्हा तेच म्हणते की यातून ते आणि त्यातून हे असा भाषांतराचा मुद्दा नाही.
लेखाच्या मथळ्यापासून ते लेखाच्या शेवटापर्यंत 'ह्यांतून ते आणि त्यातून हे'  हाच मुख्य मुद्दा आहे! ह्याच्या शिवाय मराठी ईंग्लिशाळेल का?

भाषांतरात काहीच वाईट नाही. - ईटिंग माय हेड
बऱ्याच परदेशी लोकांना संभाषण समजले नाही तर वैताग येतो. जेव्हा एखादा भारतीय माणूस परदेशी लोकांच्या बरोबर व्यावसायिक संभाषण करतो तव्हा बऱ्याच व्यावसायिक संस्था संभाषणाचा कालावधी मर्यादित ठेवतात, तेथे संभाषण कला असावी लागते. तेथे, ईटिंग माय हेड चे इंग्रजी चालत नाही. तेथे समोरच्या माणसाला समजणारेच इंग्लिश बोलावे लागते. भारतात कित्येक कॉल सेंटर (माफ करा), ग्राहक सेवा विभाग (कस्टमर सर्व्हिस) किंवा तत्सम ठिकाणी परदेशी इंग्रजी बोलण्याचे धडे दिले जातात.

आधीच विचारलेले अनुत्तरित प्रश्न:
१. फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले शब्द आणि मराठी भाषेत त्या शब्दाला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
२. मूळ इंग्रजी भाषेत शब्द आहेत, पण मराठीत त्याला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.