अनिरुद्ध - 
तुमच्या मतल्यातली मात्रांची बेरीज बरोबर आहे; पण पुढे गल्लत झाली आहे. मी प्रचलित 'आनंदकंद' वृत्तात बदल काही बदल सुचवतोय. कृपया पटतायत का पाहा. तसंच दुसऱ्या शेराला मी वृत्तात बसवलंय; पण तुम्हांला नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे, ते कळलं नाही; म्हणून मी थोडे शब्दही बदलून सुचवलेत.

गागाल गाल गागा, गागाल गाल गागा

सोयीनुसार अपुल्या देवास मानता तुम्ही
पाहून स्वार्थ अपुला धर्मास जागता तुम्ही

वाचा (कशी फुटावी) कधी फुटे का येथील (मंदिरांना) ईश्वरांना?
कुठला जुना पुराणा इतिहास सांगता तुम्ही *

ठेवा जपून आता तुमची जुनी पुराणे
दावून मोक्ष येथे आत्म्यास भोगता तुम्ही

सांगू नका मला हे थोतांड काजव्यांनो
(येताच सूर्य येथे (चळचळा)** कापता तुम्ही)
येताच सूर्य अपुल्या तेजास हरवता तुम्ही
(** हा तुमचा शब्द मात्रावृत्ताच्या दृष्टीनं बरोबर आहे आणि चांगला आहे; पण अक्षरगणवृत्तात बसत नाही).

कित्येक लोक दारी अन्नान्न करून मेले
(नैवेद्य मात्र येथे दगडास दावता तुम्ही)
दगडासमोर येथे नैवेद्य ठेवता तुम्ही
- (वृत्तप्रेमी) कुमार