शरदराव,
तुम्ही लिहिलेले शब्द वाचून मजा वाटली.
'आर्क्टिक होम इन द वेदाज' / 'ओरायन' मधे लोकमान्य टिळकांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे वेद-काळात आर्य उत्तर ध्रुवाजवळ राहायचे. (मी टिळकांवरचं पुस्तक वाचलंय, मूळ पुस्तक नाही.) त्यावेळच्या त्यांच्या संस्कृत भाषेचा कित्येक शब्दांतून आढळतो. भाषा /लिपीतं फरक झाला तरी.
१) मला वाटतं हंगेरीच्या भाषेत 'लाइव्ह'ला 'जीवि' म्हणतात आणि जे 'जीवि' नाही त्याला 'मृत्वि' म्हणतात!
२) जर्मन भाषेतही लुफ्तांसा मधे 'हंसा' (पक्षी) आहेच, अननसही आहे.
३) जुन्या इंग्रजीतही 'दाऊ' हा 'तू' च्या जवळचा शब्द होता. वुई हा संस्कृत 'वयं' च्या जवळचा शब्द अजूनही आहेच.
अलीकडेच जर्मनीतल्या आमच्या कार्यालयाच्या जेवणात पाइया(?) नावाचा स्पॅनिश भात खाल्ला आणि.. मेक्सिकन भात किंवा अगदी मराठी फोडणीचा भात आठवला. (मेक्सिकेत स्पॅनिश लोकं होते म्हणून कदाचित तिथला भात तसा असेल; पण आपला भातही?).
- कुमार