आपण नक्की कशाला मुकतोय याचा जरा विचार करायला हवा. आपण फक्त इंग्रजाळलेली मराठी बोलीभाषे मुळे व्यथित/चिंतित आहोत का जे मराठी जीवन आपण, आपण लहान असताना मजेत जगलो ते तसे राहीले नाही म्हणून हुरहुरतोय? जिवनपद्धती/संस्कृतीला मुकतोय?
जरा असा विचार करा की महाराष्ट्रात राहून शुद्ध मराठी वाचा आहे पण बाकी आचार/विचार (भारतात राहून) पाश्चात्य, तर आवडेल का?
मला एकदा (प्रेमाने) सुनावण्यात आले होते, "तू भारतात कायमचा परत आलास तर, तुझा 'सदमा' मधील कमल हसन होईल. तुला १०-१५ वार्षांपुर्वीचा भारत आठवतोय आणि भारतातील वास्तव मात्र..."!