तेथे संभाषण कला असावी लागते

जिला संभाषणकला आवश्यक असेल ती ती शिकेलच. बाकी माझ्यासारख्यांना राणीच्या देशातही असे योग्य भाषांतरित इंग्रजी वापरता येते. माझे अभारतीय सहकारी भारतीय वाक्प्रचार मजेने वापरतात हे आवर्जून सांगावेसे वाटते. असो.

१. फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले शब्द

मेज, खुर्ची, कारकून, अस्सल, अक्कल, ऐदी, जमा, खर्च, पगार, मथळा, पडदा ...

२. मूळ इंग्रजी भाषेत शब्द

अपील, लेबल, कॅमेरा, जनरल

हे, तसेच तुमच्या लेखातले

शॉवर, बाथ, ड्रम, बेसिन,
हॅंगर, ब्लाउज, पेटिकोट, स्कर्ट, टी शर्ट, फ्रॉक, गाउन  (झगा म्हणजे काय काय?)

कित्येक उदाहरणे देता येतील. यात स्वयंपाकाच्या पदार्थांची नावे (ब्रेड, टोस्ट), तंत्रज्ञानविषयक (फॅक्स, मिस्सिबल, इंजिन), विज्ञानविषयक (उदा प्रायमेट, अल्गोरिदम) शब्द नाहीत. ते बनवता येणार नाहीत असे नाही. बनवण्याचा प्रयत्न आपण लोक मनोगतावर सतत करतच असतो. पण 'आधीपासून' आहेत असे तुम्हाला वाटते म्हणून उदाहरण देते आहे.

---

मराठीला टिकवण्यासाठी रोजच्या उपयोगातल्या इंग्रजी शब्दांचे मराठीकरण केले पाहिजे हे माझे मत आहे. तुम्हाला यात काय चुकीचे दिसते ते सांगा. दुसरे काय उपाय दिसतात तेही सांगा.