१. फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले शब्द
मेज, खुर्ची, कारकून, अस्सल, अक्कल, ऐदी, जमा, खर्च, पगार, मथळा, पडदा ...
मेज, पगार या शब्दांचा उगम फारसी अथवा अरबीतून नसून पोर्तुगीज भाषेतून असावा, असे वाटते.
अवांतर: तसेच फारसी आणि अरबी याही एका गटातल्या भाषा नाहीत. (त्या तशा असल्याचा आपण दावा केलेला नाही हे मान्य.) अरबी ही सेमिटिक गटातली भाषा असून फारसी ही इंडोयुरोपियन/इंडोआर्यन गटातली (आणि संस्कृतशी नातं असलेली) भाषा आहे.
- टग्या.