'कॅमेरा' हा कक्ष किंवा खोली अशा अर्थी लॅटिन शब्द आहे. तेथून तो युरोपीय भाषांत पसरला असावा. (फोटो काढायचा कॅमेरा हाही एक प्रकारचा प्रकाशकक्ष म्हणून कॅमेरा.)
'कमरा' हा शब्द हिंदी/उर्दूत फार्सी भाषेतून आला असावा.
फार्सी, लॅटिन व संस्कृत या तीन भाषा इंडोयुरोपीय आदिभाषेतून उद्भवल्या असल्यामुळे त्यांचं जवळचं नातं आहे.
डच, जर्मन, इंग्रजी या जर्मेनिक गटातील भाषा आहेत. या गटाची आदिभाषाही संस्कृत, लॅटिन किंवा फार्सीप्रमाणे इंडोयुरोपीय आदिभाषेतून उद्भवलेली आहे. त्यामुळे त्या भाषांतही 'कॅमेरा'च्या जवळपासचा असा काही शब्द सापडणे अशक्य किंवा आश्चर्यजनक नसावे. (इंग्रजीत मात्र तो लॅटिनमधून आला असावा. इंग्रजी ही जरी मूलतः जर्मेनिक भाषा असली, तरी नंतरच्या काळात तिच्यावर आधी लॅटिन व नंतर फ्रेंच भाषांचे बरेच संस्कार झाले आहेत.)
फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश व पोर्तुगीज या रोमान्स गटातील भाषा आहेत. यांचा उगम लॅटिनपासून असून जवळपासच्या व एकाच गटातल्या/एकाच भाषेतून उद्भवलेल्या असल्यामुळे या भाषांत, विशेषतः त्यांतील शब्दांत खूपच साधर्म्य आहे असे म्हणतात.
(थोडक्यात, संस्कृत ही इंग्रजी व स्पॅनिशची मावशी आहे.)
- टग्या.