१) आवडलेला मजकूर, नोटपँड मध्ये कॉपी-पेस्ट करा. तत्पुर्वी महाजालावरून ४-५ एम्बी चे क्यूट पिडीएफ नावाचे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर उतरवून घ्या. आता प्रिन्ट करायची सूचना संगणकाला द्या. त्यात प्रिंटर म्हणून क्यूट पिडीएफ हा पर्याय निवडा. तुमचा मजकूर पीडीएफ मध्ये मुद्रित होईल. तो तुम्ही इतरांना सुध्दा पाठवू शकता.
किंव्हा...
तुम्ही जर ओपन ऑफिस वापरत असाल तरीही त्याच्या पीडीएफ चा पर्याय आहे. पण जर ओपन ऑफिस वापरत नसाल तर त्याची फाईल संगणकावर ऊतरवून घेण्याच्या फंदात पडू नका, कारण जवळ-जवळ ९० एम्बी एवढी मोठी फाईल आहे. त्यापेक्षा पहिला पर्याय जास्त सोयीस्कर आणि कमी वेळेचा-खर्चाचा आहे.