एकंदरीतच मला ही कल्पना आवडली. शुल्क देऊनही जर मराठी भाषेसाठी एखादी चांगली आणि दर्जेदार नभोवाणी येत असेल तर फारच चांगली गोष्ट ठरेल.

एकतर नभोवाणीला आजही खूपच प्रेषकवर्ग / श्रोतावर्ग आहे, दुसरे म्हणजे अनेक नवीन कलाकारांना उदाहरणार्थ मध्ये मनोगतवर मकरंद टिळकाच्या कथाबोलीचा उल्लेख होता, अश्या कलाकारांना एक जिवंत व्यासपीठ मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भाषेने सर्वच नूतन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, नव्हे तर इतरांना ती पथदर्शक असली पाहिजे.

महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे अंदाजे १ कोटी मराठी भाषिक असतील म्हणजे अंदाजे २० लक्ष मराठी घरे असतील. त्यापैकी ५० सहस्र लोकांनी याचे सशुल्क १००० रुपये दिले तर ५०० लक्षाचा ताळेबंद नजरेसमोर दिसतो. अर्थातच त्यासाठी दर्जेदार कार्यक्रमाची निर्मिती केली पाहिजे हेही खरे.
नाट्य, शिक्षण, वैद्यकीय माहिती, कृषी इत्यादी क्षेत्रांना या नभोवाणीचा लाभ होईल असे मला वाटते.

सुरभीला व्यावसायिकदृष्ट्या चांगले यश मिळावे असेच मला वाटते.