सगळेच शेर आवडले...!
कुठला अधिक चांगला ते नाही सांगता येणार...!
का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
खरं तर हा आहे असाच शेर मला छान वाटला, पण तुम्ही बदल करू इच्छित असाल तर असे बदल चांगले वाटतील का?
का अवस मी खुळ्याने जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
किंवा...
का अवस मी नकोशी जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
किंवा...
का अवस मी गडे ही जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
किंवा...
का अवस मी सखे ही जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला