आपल्याला काय म्हणायचे आहे समजले नाही.
मनोगती गायन ,वादन, लेखन चित्रकला अशा विविध कलाप्रांतात सक्रीय आहेत. आपण नेहमीची उदाहरणे दिली असती तर अधिक बरे झाले असते असे विधान केले
या वाक्यांचा एकमेकांशी काही संबंधच लागत नाहीये. जर कला क्षेत्रातले लोक विद्वान असतात असे आपण कबूल करता मग मी तीच नेहमीचे उदाहरणे घेतली असूनही आपल्याला आणखी वेगळी कुठली नेहमीची उदाहरणे हवी आहेत हे लक्षात आले नाही.
कुठलेही गुण घेतले असते तरीही आपण हेच म्हणाला असतात कारण मनोगतावरील लोक अनेक कलागुणांत निपुण आहेत !
अशावेळी आम्हाला आपला लेख वाचून 'हा काही विशिष्ट मनोगतींना उद्देशून तर नाही ना' असे मनात आले
असे वाटायचे कारणही लक्षात येत नाही. आता तुम्ही जर ओढून-ताणून असा अर्थ काढू इच्छित असाल तर त्याला माझा नाईलाज आहे कारण शेवटी खाई त्याला खवखवे.
कोणतेही वादळ निर्माण झाले नाही व होऊ नये असेच वाटते
असे आपल्या प्रतिसादावरून तरी नक्की वाटत नाही. कारण तुम्ही 'हा काही विशिष्ट मनोगतींना उद्देशून तर नाही ना' असे खोचकपणे लिहिले आहे. एखाद्याला लेख वाचताना तसे वाटले नसेल मात्र आपले प्रतिसाद वाचल्यावर मात्र नक्कीच असे वाटू शकते हे मला वेगळे सांगण्याची गरजही उरली नाही.