सारंग,
का अवस मी खुळ्याने जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
हा बदल आवडला. पण एकंदर दोन ओळींत खुळेपणा दिसतोच आहे. त्यामुळे 'खुळ्याने' हा शब्द अनावश्यक होतो. माझ्या मनात अवस आली होती. पण 'अवस' ह्या शब्दातले तीन लघू इथे कानांना खटकले. असो. अवस ही नकोशीच असते त्यामुळे दुसरा बदल घेतला नाही. 'गडे' आणि 'सखे 'मुळे अर्थ प्रेयसीपुरते मर्यादित होतात. त्यामुळे तोही नाही. एकंदर कठीण काम आहे. सुचवण्यांबद्दल धन्यवाद.