केशर लिंबू सरबतात सुद्धा छान लागते. थोडेसे केशर (एक पेला सरबताला दोन काड्या) घ्यावे. एक छोटी लोखंडी कढई घ्यावी (पदार्थांना वरून फोडणी घालायला वापरतो तेवढी). ती जरा चटचटीत तापवावी आणी त्यात केशर थोडेसे गरम करावे. असे केल्याने त्याचा रंग छान उतरतो. लिंबू  सरबत करताना त्यात हे केशर घालावे. शक्यतो केशराच्या काड्या मोडणार नाहीत अशी काळजी घ्यावी. स्पॅनिश केशराच्या काड्या छान लांब असतात, त्या न मोडताच चांगल्या दिसतात. असे लिंबू सरबत मग थोडा वेळ (जमल्यास काही तास) शीतकपाटात ठेवावे. मग मस्त प्यायला घ्यावे.

अधिक वातावरणनिर्मितीसाठी असे सरबत पितळेच्या किंवा तांब्याच्या उंच पेल्यामध्ये प्यायला द्यावे व जमिनीवर पसरलेल्या गाद्यांवर बसून लोडाला टेकून मस्त गप्पा मारत प्यावे. बरोबर काही चटपटीत खायला असेल तर उत्तमच.

आपला (नवाब) इहलोकी.